जालना – क्यो बे मोटे क्या चल रहा असे म्हणताच आरोपीने तरुणाच्या गळ्यावर धारदार ब्लेड ने वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणार्या आरोपीस सदर बाजार पोलीसांच्या डिबी पथकाने काल सायंकाळी भोकरदन नाका परिसरातुन जेरबंद केलेय.
भोकरदन नाका परिसरातील चेतक शोरुम समोर २ आॅक्टोबंर रोजी राञी ९ वा.शेख रशीद शेख मुनीर हा अस्लम तांबोळी यास क्यो बे मोटे क्या चल रहा, असे म्हणताच असलम तांबोळी ने जवळील धारदार ब्लेड ने शेख मुनीर च्या गळ्यावर वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान घटने नंतर फरार झालेल्या असलम तांबोळी विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता,
फरार आरोपी चा शोध घेत असतांनाच सदरील आरोपीस काल बुधवार सायकाळी पो.नि.प्रशांत महाजन,एपीआय नित्यानंद उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली डिबी पथकाचे रामप्रसाद रंगे,सुभाष पवार,जगन्नाथ जाधव,सोमनाथ उबाळे आणि भरत ढाकणे यांनी जेरबंद केले