उरण (संगीता ढेरे) – चाईल्ड केअर सामाजिक संस्थे तर्फे वर्षभरात अनेक विविध उपक्रम राबवले जातात.त्यातील नवदुर्गा सन्मान हा एक उपक्रम संस्थेचे संस्थापक विकास कडू यांच्या नेतृत्वाखाली या वर्षीहि नवदुर्गा सन्मान २०२३ हा पुरस्कार विविध श्रेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना देण्यात आले. पुरस्कार प्राप्त महिला खालील प्रमाणे१) कनिष्का नाईक(महिला पोलीस ), २) रेखा ठाकूर (अभिनेत्री ), ३)शारदा खारपाटील (आदर्श शिक्षिका), ४) तुप्ती भोईर (टीव्ही वृत्त निवेदिका), ५) हेमाली पाटील (लेखिका /कवी), ६) वृषाली पाटील(गायिका), ७) संगीता ढेरे (समाजसेविका), ८) सीमा भोईर (पत्रकारिता), ९)डॉ प्रियांका म्हात्रे (वैद्यकीय क्षेत्र) या नवदुर्गाचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंद खारपाटील ,(संपादक महामुबंई चैनल )विकास कडू (संस्थापक -चाईल्ड केअर संस्था ), विठ्ठल ममताबादे( चाईड केअर संस्था मीडिया सल्लागार), जेष्ठ गायक गणेश बंडा, कल्पेश थाळी (अध्यक्ष -द्रोणागिरी देवस्थान कारंजा ), देविदास थळी, मेघनाथ थाळी, शैलेश डाऊर, शांताराम डाऊर,विकास थाळी, महेंद्र घरत, मनोहर थळी तसेच चाईल्ड केअर सामाजिक संस्थेचे विकास कडू (संस्थापक अध्यक्ष ),विक्रांत कडू (अध्यक्ष ),तुषार ठाकूर (कार्याध्यक्ष ), रिया कडू (सह सचिव ), ह्रितिक पाटील (उपाध्यक्ष ), उद्धव कोळी (सह खजिनदार ), विवेक कडू (सदस्य ), रोशन धुमाळ (सदस्य ) आणि करंजा गावातील हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.
नवदुर्गा सन्मान कार्यक्रम विकास कडू यांच्या संकल्पनेतून करण्यात आला. या चाईल्ड केअर सामाजिक संस्था च्या उपक्रमास ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला.या कार्यक्रमा बद्दल बोलताना चाईल्ड केअर सामाजिक संस्थाचे संस्थापक, अध्यक्ष विकास कडू मनोगत व्यक्त करताना म्हणाले की “नवदुर्गा सन्मान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे कारण हा सन्मान नारी शक्ती चा सन्मान आहे.या सन्मानाने उरण च्या संपूर्ण नारी शक्तीचा सन्मान झाला आहे. आणि यामुळे उरण तालुक्यातील ९ महिला नव्हे तर हजारो स्त्रिया आपआपल्या क्षेत्रात उल्ल्खनीय कार्य करतील ” या कार्यक्रमांस सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर आणि कुणाल पाटील (सरपंच पागोटे ), जयप्रकाश पाटील(अध्यक्ष नवघर) यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विकास कडू यांनी केले तर आभार प्रदर्शन विक्रांत कडू यांनी केले. एकंदरीत चाईल्ड केअर सामाजिक संस्थेतर्फे आयोजित नवदुर्गा सन्मान सोहळा मोठया उत्साहात, उत्तम प्रतिसादासह संपन्न झाला.