उरण (तृप्ती भोईर) – गुरुकुल ॲकॅडमी सार्वजनिक नवरात्रोत्सव उरण यांच्या वतीने दरवर्षी देवीची मूर्ती ची स्थापना करून नऊ दिवस रास गरबा, आणि महिलांसाठी विविध उपक्रम, मंगळागोरी स्पर्धा, होम मिनिस्टर यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. उद्देश हा की, महिलांना आपल्या जवळ असलेल्या कलागुणांना सादर करण्यासाठी एक व्यासपीठ दिले जाते.
याही वर्षी ॲकॅडमी च्या वतीने महिलांसाठी विविध स्पर्धा सोबतच उरणमधील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या नव दुर्गांचा गुरुकुल ॲकॅडमी च्या तर्फे यथोचित सन्मान करण्यात आला. सन्मानित करण्यात आलेल्या नव दुर्गां पुढीलप्रमाणे १) हिरावती घरत – दिव्यांग महिला (नवीन शेवे), २) दर्शना माळी – शिक्षिका(बालई), ३) सरिता म्हात्रे – ए सि पी (उरण पोलीस ठाणे), ४) काजल – वकील
५) तृप्ती भोईर – पत्रकार (अंबेनगर), ६) रेखा घनवट – सहायक पोलीस निरीक्षक उरण, ७) पद्मजा पाटील – पोलीस उपनिरीक्षक, ८) डॉ. गीरी – उरण, ९) डॉ. वनिता पाटील – बोकरविडा, १०) ज्योती भालचीन – तलाठी (केगाव)
या नव दुर्गांचा साडी, श्रीफळ हळदीकुंकू चे वाण ओटी व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. गुरुकुल ॲकॅडमी चे संस्थापक मा. प्रशांत पाटील व मा. भावना घाणेकर व त्यांचे इतर पदाधिकारी यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाने कार्यक्रम सुंदर रित्या साजरा झाला. कार्यक्रमाचे दमदार सुत्रसंचालन दर्शना माळी यांनी केले होते.