जालना – मराठवाड्यात सर्वांना सोबत मिळून चांगलं काम करायचं आहे. बालविवाह निर्मलनाबरोबरच मुलींच्या सर्वांगीन विकासासाठी प्रत्येकाने चांगले निर्णय घ्यावेत, मुलींसाठी असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचवाव्यात आणि त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक प्रगतीसाठी चांगले ठराव गावपातळीवर घ्यावेत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.
आझादी का अमृत महोत्सव निमित्त अमृत कलश आणि विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या प्रांगणात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुबाकले, अंकुश चव्हाण, कोमल कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री पांचाळ म्हणाले की, आजचा ग्रामसेवक संघटनेने आयोजित केलेला कार्यक्रम प्रभावी आणि देशप्रेम जागृत करणारा आहे. या कार्यक्रमातला जिवंतपणा पाहुन अनेकांच्या मनात देशप्रेम जागृत झालं. खरं तर शासनाच्या सुचना आहेत म्हणून कार्यक्रम करणं हा भाग वेगळा आहे. परंतु, सुचनेपेक्षाही जास्तीचं आणि चांगलं काम जालना जिल्ह्यात होत आहे. त्यामुळे आपला जिल्हा देशातून पहिला आल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी व्यक्त केलाय. स्वयंस्फुर्तीने ग्रामसेवकांनी एकत्र येत मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत अमृतकलश यात्रा काढली ही गौरवाची बाब आहे.
हे काम करीत असतांना बालविवाह रोखणे आणि मुलींच्या प्रगतीसाठी ग्रामसेवकांची महत्वाची भुमीका आहे. कारण गावपातळीवर ग्रामसेवकांचा नेहमीच जनतेसोबत संपर्क येतो. त्यामुळे त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी आणि बालविवाह यावर काम करावंं, मुलीची सामाजिक प्रगती कशी होईल यावर जास्त काम करावं. मुलीच्या प्रगतीसाठी चांगले वातावरण निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे. ग्रामसेवकांनी स्वतः त्यांच्याकडे लक्ष द्यावं, त्यांच्यात चांगला बदल घडवूण आनावा. बालविवाह थांबविने आणि त्याचे निर्मुलन करायचे असेल तर बालविवाहाचा लोगो हा शासनाच्या सुचनाची वाट न पाहता सर्वच ठिकाणी लावा. आपल्या घरात, कार्यालयात, ऑफीसमध्ये हा लोगो नक्की लावा, कुणी परिपत्रक जरी काढलं नसलं तरी तो स्वयंस्फुर्तीने लावावा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामसेवक संघटनेचे मानंद जिल्हाध्यक्ष प्रवीण पवार, जिल्हाध्यक्ष डी. बी. काळे, सरचिटणीस पी.एस. वाघ, कोषाध्यक्ष एन.टी. गावंडे, कार्याध्यक्ष के. डी. भोजने, महिला राज्य उपाध्यक्ष डी.पी. भालके, जिल्हा उपाध्यक्ष एल.एस. आहेरकर, महिला जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी पारेकर, सहसचिव एस.पी. लोखंडे, संघटनक एस.एस. अवघड, ए.एम. वडगावकर, एम. ए. साबळे, ए.बी. मेहेत्रे, एस. एम. माने, एस. जी. गाडगे, शारदा मेहेत्रे, सोनाली अष्टीकर, एन. टी. खिल्लारे, जालना तालुकाध्यक्ष आर.यु. गोरे, सचिव महेश वझरकर, परतुर तालुकाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, सचिव यु. एस. नांगरे, घनसावंगी तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ मानकर, सचिव विनोद भगत, भोकरदन तालुका अध्यक्ष मनोहर गायकवाड, सचिव सिद्धार्थ पगारे, जाफराबाद तालुका अध्यक्ष सुनील लोखंडे, सचिव मदन डोईफोडे, मंठा तालुकाध्यक्ष नरेंद्र पवार, सचिव प्रदीप पालवे, बदनापूर तालुका अध्यक्ष जे.के. उगले, सचिव के.डी. ढाकणे, अंबड तालुकाध्यक्ष व्ही. एम. राठोड, सचिव वसंत नागरगोरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक यांनी परिश्रम घेतले.
आपल्या देशासाठी आणि समाजासाठी सर्वांनी कर्तव्याचे पालन करावे – मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना
मला जर कुणी विचालं की तुम्हाला या देशात सर्वात जास्त काय आवडते तर मी अभिमानाने सांगेन की मला या देशात विविधतेत एकता ही सर्वात जास्त आवडते. विविधतेने नटलेल्या माझ्या देशातील एकता ही आमच्यासाठी खुप महत्वाची आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेत. आता आपल्यालाच देशाला पुढे घेऊन जायचे आहे. देशाच्या विकासात आपल्याला सहभागी व्हायचे आहे. त्यामुळे आपण देशासाठी, समाजासाठी, परिवारासाठी आपल्या कर्तव्याचे पालन करावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना यांनी केलं.
आज मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत ग्रामसेवीकांनी सादर केलेले स्कीट पाहुन भावना अणावर झाल्या. ते पाहून डोळ्यात पाणी आलं. मेरा माटी मेरा देश हा कार्यक्रम अत्यंत छान आहे. आपल्या देशातील विविध भागातील माती एकत्र होणार आहे. या मातीप्रमाणेच आपण देशील नागरीकांनी एकत्र आणि एकसंघ राहीले पाहिजे. कोणत्याही भांडणात सहभागी होऊ नका, विविधतेमधील एकतेत सर्वांनी सहभागी झालं पाहिजे. असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना यांनी केंल. तसेच उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादर केलेली निराशा ही कविता अत्यंत चांगली असून त्या कवितेमधील मेसेज हा सर्वांनी घरा-घरात पोहचवावा असे आहवान त्यांनी केले. यावेळी श्रीमती वर्षा मिना यांनी ग्रामसेवकांच्या कामकाजावर समाधान व्यक्त करीत ग्रामसेवकांचा उपक्रम हा स्तुत्य असून त्याचा आदर्श इतर सर्वांनी घ्यावा. असेही त्यांनी म्हटले.
ग्रामसेवकांनी विविध गावातून जमा केलेल्या मातीच्या कलशाची अंबड चौफुली येथून काढली रॅली
देशात मेरी माटी मेरा देश या अभियाना अंतर्गत गावा-गावातून अमृत कलशच्या माध्यमातून मातीचे संकलन करण्यात आले आहे. सदरील कलश हे तालुका स्तरावरुन आता थेट जिल्हा परिषदेत आणले गेले असून त्या कलशाची अंबड चौफुली येथून रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालय मार्गेे जिल्हा परिषदेपर्यंत आणण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील सर्वच गावातील ग्रामसेवकांनी विविध वेशभूषा साकारत रॅलीत सहभाग नोंदविला होता. सदरील रॅली ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात गेली असता जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी अमृतकलश यात्रेला भेट देत सर्वांचे स्वागत केले. यावेळी फौजीच्या वेशभुषेतील महिला ग्रामसेवीकांनी जिल्हाधिकारी यांना सलामी दिली.
जालना, परतुर, मंठा, जाफराबाद, भोकरदन, अंबड, घनसावंगी, बदनापुर या 8 तालुक्यातून आणलेले अमृतकलश जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमस्थळी ठेवण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी या अमृतकलश यात्रेत सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मैदानात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली.