जालना – तालुक्यातील रामनगर येथे मराठा तरुणांनी आक्रमक होत थेट तहसिलदार यांच्या चारचाकी वाहनाला टार्गेट करुन वाहन फोडले.
यावेळी इतर 3 बसेसवरही दगडफेक करुन बसचे नुकसान केल्याची घटना घडली. मराठा तरुण आक्रमक होत असल्याचे पाहुन परतुर चे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत यांनी रामनगर येथे धाव घेत आंदोलकांना शांत केलं. शिवाय शांततेच्या मार्गाने आंदोलन करुन आपल्या मागण्या मांडाव्यात, प्रक्षोभक आंदोलन करुन नये असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत यांनी केलंय. सध्या रामनगर भागात शांतता आहे.