भोकरदन – अंतरवाली सराटी येथे गरजवंत मराठ्यासाठघ आरक्षणाचा लढा उभा करून उपाशी राहुन जिवाची पर्वा न करता आपल्या न्यायहक्कासाठी लढत असलेले मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांना सरकारने 30 दिवसाची मुदत द्या आरक्षण देतो असे वचन दिले होते.जरांगे पाटलांनी त्यात अजुन 10दिवस वाढवुन देऊनही वचनपुर्ती न करणार्या दळभद्यी शासनाचा निषेध व मराठा आरक्षणावर न बोलणार्या मराठवाड्यातील आमदार खासदार,विधाननपरीषद सदस्य यांचा निषेध म्हणुन भोकरदन येथे शिवाजी चौकात ता,28 शनिवारी सकाळी अकरा वाजता महिला ऐल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोर्चाच्या सकल मराठा समाजातील महिलामंडळीच्या वतीने साडी चोळी बांगड्याचा आहेर स्पीटपोष्टाने पाठवण्यात आल्या. दरम्यान मराठा आरक्षणाची मागणी गेल्या अनेक वर्षापासुन चालू आहे मराठ्यांनी 58 मोर्चे शांततेत काढले आहे मराठा समाजाच्या भावना तीव्र आहे इतर समाजाचे नेते त्यांच्या समाजाची बाजु समर्थपणे पेलत असतांना मराठा समाजातील नेते आरक्षणावर एकही शब्द बोलतांना दिसत नाही याचा रोष म्हणुन सकल मराठा समाजातील महिला मोर्चेकर्यांनी मराठवाड्यातील आमदार खासदारांना हा अनोखा आहेर पाठवुन वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. या एल्गार मोर्चात तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता ,
छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळुन मोर्चाला सुरुवात झाली तिथे महिलांची आरक्षणावर भाषणे झाली त्यानंतर रॅली पोष्ट ऑफीसपर्यंत मोर्चाचा शेवट करण्यात आला.