जालना – शहरातील सदर बाजार पोलिसांनी आज दिनांक 29 रोजी 2023 रोजी भगतसिंग चौक हनुमान घाट येथील मनोज कुरलिये यांच्या घरातून दोन तलवारी जप्त केल्यात. त्यापूर्वी दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सुमित बियर बार चा मालक सुमित राजेश कपूर यांच्याकडून दोन तर इतर एका ठिकाणाहून आणखी एक तलवार जप्त केली होती.
आठवडाभरात सदरबाजार पोलिसांनी एकूण पाच तलवारी जप्त केल्यात. या प्रकरणी आरोपीविरुद्ध धारदार शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सदरबाजार पोलीसांनी केलेल्या कारवाईबद्दल सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.