बीड – आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहे. अशातच बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठा आंदोलक आक्रमक झाले असून राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळूंके यांच्या बंगल्यावर दगडफेक करण्यात आली. यावेळी काही आंदोलकांनी बंगल्याच्या पार्किंगला आग लावली. या आगीत सोळुंके यांच्या कारसह बंगल्याला देखील आग लागली. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
माजलगावमधील मराठा आंदोलनाला पुढे हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी आक्रमक होत सोळंके यांच्या बंगल्याजवळ असलेल्या पार्किंगला आग लावली तेव्हा आगीचे लोट बंगल्यापर्यंत पोहचले. आगीने संपूर्ण बंगल्याला विळखा घातला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये.