आरक्षणासाठी मराठा समाजाकडून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरु आहेत. या दरम्यान जालन्यातील बदनापूर शहरात मराठा आंदोलक आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाले असून आंदोलकांनी शासकीय कार्यलयात घुसत कर्मचाऱ्यांना बाहेर काढत कार्यालयाला कुलूप ठोकले आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झालेला पाहण्यास मिळत आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आरक्षण मिळावे यासाठी आग्रही मागणी केली जात आहे. जालन्यात आंदोलन सुरु असताना आंदोलकांनी बदनापूर तहसील व पंचायत समिती कार्यालयात घुसून महिला तहसीलदार आणि महिला कर्मचाऱ्यांना विनंती करून बाहेर काढले. यानंतर शासकीय कार्यालयांना टाळे ठोकायाला सुरवात केली आहे. आंदोलक सर्वच कार्यालये बंद करण्याच्या मार्गावर आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा म्हणून कार्यालये बंद करण्यात येत आहेत. तहसिल, पंचायत समिती, नगर पंचायत, भूमी अभिलेख कार्यालयांना कुलूप ठोकण्यात आलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आंदोलक आक्रमक झाले आहे. त्यामुळे आता मराठा समाजाच्यावतीने शासकीय कार्यालयावर ताबा मिळवायला सुरवात केली आहे.