रायगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये असलेल्या एमआयडीसीतील ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये एका कामगाराला गॅसची लागण झाली आहे. या दुर्घटनेत चार कामगार दगावल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच कंपनीमध्ये काही कामगारही अडकल्याचीही शक्यता आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाड एमआयडीमधील ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये शुक्रवारी सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये एका कामगाराला गॅसची लागण झाली असून चार जण दगावल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप या मृत्यूंबाबत कंपनीने अधिकृत दुजोरा दिला नाही.
दुर्घटनेतील तीन जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलासह पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रण आणण्याचे काम सुरू असून काही कामगार अडकल्याचीही भिती आहे.