महाराष्ट्र सीमेपासून तीन किलमीटर अंतरावर छत्तीसगड राज्यात नक्षलवाद्यांनी तिघांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुरखंडी गावालगत ही घटना घडली आहे. छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील मुरखुंडीच्या तीन नागरिकांचे नक्षलवाद्यांनी चार दिवसापूर्वी अपहरण केले होते. गुरुवारी त्यांची हत्या करून त्यांचे मृतदेह नक्षलवाद्यांनी. लगतच्या जंगलात फेकून दिले. त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांचे मृतदेह गावात आणल्याची माहिती पाेलीसांकडून मिळाली.
पोलिसांचे खबरे ठरवून नक्षलवाद्यांनी या तिघांची हत्या केल्याचे बोलले जात आहे. छत्तीसगड राज्यात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार सुरू असतानाच नक्षलवाद्यांनी ही घटना करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.
हा परिसर गडचिरोली जिल्ह्याच्या जांबिया गट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीपासून अवघ्या तीन किलाेमीटरवर लागून आहे.