पुणे शहरात ताराचंद रुग्णालयातील विद्यार्थिनींच्या वसतिगृहाला आग लागल्याची घटना घडलीये. विद्यार्थिनी वसतिगृहात असतानाच ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि कसबा अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
वसतिगृहाची ही इमारत एकूण ४ मजल्यांची आहे. सकाळी ९ च्या सुमारात पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक ४ मध्ये ही घटना घडली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचताच त्यांनी प्रथम मुलींना सुरक्षित बाहेर काढले. तसेच मजल्यावर आतमध्ये आणखी कोणी अडकले आहे का याची खात्री करून घेतली.
त्यानंतर जवानांनी सदर खोलीत आगीवर पाणी मारले आणि नियंत्रण मिळवले. या घटनेत खोलीमधील शैक्षणिक साहित्य, लाकडी सामान व इतर वस्तू पूर्णत: जळाल्यात. खोलीमध्ये असलेल्या हिटरमुळे आग लागल्याची प्राथमीक माहिती समोर आलीये.