जालना – महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाउंडेशन, अखिल भारतीय मारवाडी संमेलन शाखा जालना व मारवाडी युवा युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता रुक्मिणी गार्डनमध्ये दीपावली स्नेहमिलन, अन्नकुट व मारवाडी युवा मंचच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला असून, सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीच्यावतीने उद्योजक अनिलकुमार गोयल यांनी केले आहे.
दीपावली स्नेह मिलनाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी उद्योजक अनिलकुमार गोयल तर प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री अतुल सावे, आ. बबनराव लोणीकर, आ. कैलास गोरंट्याल, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, आ. राजेश टोपे, आ. नारायण कुचे, आ. संतोष दानवे, माजी आमदार श्रीमती शकुंतलादेवी शर्मा, मारवाडी संमेलनचे मराठवाडा विभाग प्रमुख चंदुलाल बियाणी, मारवाडी संमेलनचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री निकेश गुप्ता, उद्योगपती घनश्यामदास गोयल, मारवाडी संमेलनचे प्रदेश संघटन मंत्री वीरेंद्र धोका, सुरेशकुमार जेथलिया, अरविंद चव्हाण, भास्करराव आंबेकर, भूषण देविदान, योगेश मानधानी, संतोष सांबरे, संजय खोतकर, विजय अग्रवाल, भास्करराव दानवे, मनीष राठी, हर्षद अग्रवाल गजानन जांगिड जितेंद्र राठी, रामनिवास गौड, जयभगवानदास जिंदल, उमेश दाड, राजेंद्र ओस्तवाल, पुरुषोत्तम तोष्णीवाल, राजेश उपाध्याय, सीए पियुष अग्रवाल, कमलकिशोर झुनझुनवाला, एड. डॉ. नितीन रुणवाल, विजय अग्रवाल, दीपक जांगिड, जालना शहर मारवाडी संमेलनचे नवनियुक्त अध्यक्ष सुरेंद्र चेचाणी, कार्याध्यक्ष उमेश पंचारिया, सचिव सुदेश करवा, कोषाध्यक्ष सुनील राठी यांची उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमानंतर कालिका स्टीलच्यावतीने अन्नकुटचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय मारवाडी संमेलनचे जिल्हाध्यक्ष सुभाषचंद्र देविदान, कार्याध्यक्ष सीए गोविंदप्रसाद मुंदडा, स्वागताध्यक्ष गौतम मनोत, सचिव सुनील बियाणी, सहसचिव रमेशचंद्र अग्रवाल फरशीवाले, मारवाडी संमेलनचे शहराध्यक्ष सीए डॉ. नितीन तोतला, सचिव पंकज जैन, कोषाध्यक्ष अभय करवा, मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष महेश भक्कड, सचिव पियुष होलानी, कोषाध्यक्ष रमेश मोदी यांच्यासह मुख्य संयोजक विजय कामड, महावीर जांगीड, मनीष तवरावाला, विजय जैन, पवन जोशी, दिनेश बरलोटा, शाम लखोटिया, सुरेंद्र मुनोत,संजय बाहेती, राजेंद्र आबड, लखन अग्रवाल, राहुल अग्रवाल, चेतन बोथरा, उमेश बजाज, रामनिवास चेचानी, पंकज देवीदान, रामेश्वर सोमानी, संमेलनाचे आश्रयदाते सुरेंद्र पित्ती, द्वारकादास सोनी, सुरेश अग्रवाल, संजय राठी, राजेंद्र भारुका, कैलास लोया, सतीश अग्रवाल, राम अग्रवाल, समीर अग्रवाल, गोपीकिशन जाजू, दिनेश राठी, आशिष भाला, सुनील अग्रवाल, अन्नकुटचे आयोजक कालिका स्टीलचे अनिलकुमार नंदकिशोर गोयल, सुनील नंदकिशोर गोयल, यश गोयल, करण गोयल व गोयल परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.