रायगड – जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये भरधाव कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, माणगाव म्हसळा मार्गावरील देवघर येथे इर्टिगा कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली.
चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झालेत.
पुण्यातील हडपसर येथून दिवेआगर येथे फिरण्यासाठी हे पर्यटक आले होते. माणगावच्या देवघरजवळ आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. जखमी झालेल्या दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, वर्ध्यामधील नागपूर-तुळजापूर महामार्गावरील पवनार परिसरात बुधवारी एक भीषण अपघात झाला. महामार्गावरून चुकीच्या दिशेने दुचाकी चालवीत दुभाजक ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना भरधाव येणाऱ्या कारने जबर धडक दिली. या धडकेत पती जागीच ठार झाला तर पत्नीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.