जालना – जिल्ह्यात ब्राम्हण समाजाच्या विविध मागण्यासाठी सुरु असलेल्या उपोषणाला आज जय भीम सेनेचं संस्थापक अध्यक्ष सुधाकर निकाळजे आणि त्यांच्या पदाधिकार्यांनी भेट देत जाहिर पाठींबा दिलाय. तसे पाठींब्याचे पत्रही उपोषणस्थळी देण्यात आलंय.
ब्राम्हण समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी सरकारने भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं. या मीगणीसाठी चमन येथे दीपक रणनवरे यांनी आमरण उपोषण सुरु कलंय. या मागणीला जयभीम सेनेच्या वतीने आज जाहीर पाठींबा देण्यात आलाय. तसेच ब्राम्हण समाजाच्या मागण्या तात्काळ मान्य झाल्या पाहिजेत, त्यांच्या उपोषणाकडे सरकारने दुर्लक्ष करुन नये असंही जय भीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निकाळजे यांनी म्हटलंय. यावेळी ब्राम्हण समाजातील नेत्यांसह संस्थापक अध्यक्ष सुधाकर निकाळजे, संस्थापक कार्याध्यक्ष रोहिदास गंगातिवरे, केंद्रीय उपाध्यक्ष शे.अख्तर, प्रदेश कार्याध्यक्ष मधुकर धेंवदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.