जालना(प्रतिनिधी) – क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद , जालना यांच्या वतीने जालना शहरात जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित 17 वर्षा खालील मुले व मुलींच्या राज्यस्तर शालेय बेसबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, स्पर्धेचे बक्षीस वितरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना वर्षा मीना यांनी सांगितले की, खेळामध्ये गुणवत्ता वाढविण्यासाठी सर्वांनी स्पर्धेत सहभागी होणे महत्त्वाचे आहे, हार जित ही चालूच राहणार, जिंकलो किंवा हारलो यांवर लक्ष देण्यापेक्षा स्पर्धेत आपण सहभागी झालो किंवा नाही हे महत्त्वाचे आहे, त्यांनी पुढे असेही सांगितले की, खेळाडूंनी नेहमी टीम स्पिरिट ने काम केले पाहिजे, मग खेळाची स्पर्धा असो किंवा आपले दैनंदिन जीवन असो, टीम स्पिरिट ने काम करणारे स्वतः ही यशस्वी होतात या आपल्या सहकारी यांना ही यशस्वी करतात.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले. प्रस्ताविकामध्ये स्पर्धेचे महत्व विषद करून आयोजन समितीच्या वतिने मा पालकमंत्री ना. अतुल सावे , मा . जिल्हाधिकारी डॉ . श्रीकृष्ण पांचाळ सर यांच्या संकल्पनेतून प्रथमच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना जिल्हा नियोजन समिती व जिल्हा क्रीडा परिषदेच्या माध्यमातून टी शर्ट , कॅप , देण्यात आलेली असून स्पर्धेत प्रथम , व्दितीय , तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या संघातील खेळाडूंना स्मॉर्ट वॉच , मेडल , ट्रॉफी व राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झालेल्या खेळाडूंना पण स्मार्ट वॉच देण्यात येत आहे बाबत माहीती दिली. तसेच मा . पालकमंत्री ना. अतुल सावे , मा जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्राविण्य मिळवलेल्या व राज्य संघात निवड होणाऱ्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या बाबत माहीती दिली . तसेच महाराष्टू बेसबॉल असोसिएशन चे सचिव राजेंद ईखनकर यांनी मार्गदर्शन करतांना बेसबॉल खेळाची माहीती देऊन खेळाडूं शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंचावर महाराष्ट्र बेसबॉल संघटनेचे तांत्रिक समिती प्रमुख इंद्रजित नितनवार , सहसचिव प्रदीप साखरे , जिल्हा बेसबॉल संघटनेचे सचिव प्रमोद खरात , जिल्हा क्रीडा संघटक शेख चाँद पी.जे., राज्य संघ निवड समिती सदस्य नंदन परब, श्रीमती रेखा धनगर, श्रीमती क्षितिजा गव्हाणे, तसेच विविध जिल्ह्यांचे सचिव राजेंद्र बनसोडे, नारायण बत्तुले, अमरावती क्रीडा अधिकारी दीपक समदुरे, क्रीडा संघटक विजय गाडेकर आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी स्पर्धेत पंचांचे काम करणारे आनंदा कांबळे, आकाश साबणे, गणेश बेटुडे, निशांत राजपूत, गणेश भोसले, भागवत पाटील, शाहू देशमुख, नयन नवले, सचिन जाधव, नंदू गायके, संतोष अवचार, सचिन सोनकांबळे, सायमा बागवान यांचा श्रीमती वर्षा मीना यांच्या हस्ते बुके व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, तसेच आयोजन समितीत काम करणारे एकनाथ सुरुसे, सोपान शिंदे, विकास काळे, राजेश ठाकूर, देवा चित्राल, सोमनाथ नलावडे, सतीश गाभुड, अमोल सातपुते, ज्ञानेश्वर कळसे, अशोक शिंदे, यासीन बागवान, जयपाल राठोड, प्रसन्न पंडीत, इस्माईल शेख, कैलास नाटकर, राणी नाटकर यांचाही याप्रसंगी श्रीमती वर्षा मीना यांच्या हस्ते बुके व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे उत्कृष्ट सूत्र संचालन केल्याबद्दल देवेंद्र बारगजे यांचाही सत्कार करण्यात आला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व विभागीय क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा प्रमुख रेखा परदेसी, क्रीडा मार्गदर्शक शेख मोहम्मद, संतोष वाबळे, शेख हारून, राहुल गायके आदींनी परिश्रम घेतले