जालना । प्रतिनिधी – राज्यातील विविध भागात स्वतःचा जिव धोक्यात घालून सापाचं रेस्क्यु करणार्या सर्पमित्रांचा शासनाने किमान 5 लाख रुपयाचा विमा काढावा आणि त्यांना ओळखपत्र द्यावे अशी मागणी आमदार कैलास गोरंट्याल यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशात केलीय. त्यामुळे जालना येथील निसर्गरक्षक प्राणीमित्र संघटनेच्या वतीने आमदार कैलास गोरंट्याल यांचा सत्कार करण्यात आला.
आमदार कैलास गोरंट्याल यांनी महाराष्ट्रातील सर्पमित्रांचा प्रश्न विधानसभेत मांडून सर्पमित्रांचा विमा काढण्याची मागणी केली. तसेच वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना पत्र व्यवहार करून हा प्रश्न तातडीने मार्ग लावण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे निसर्ग रक्षक प्राणी मित्र संघटनेच्या वतीने आज दि. 17 डिसेंबर 2023 रोजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी निसर्ग रक्षक प्राणीमित्र संघटनेचे अध्यक्ष सर्पमित्र विशाल गायकवाड, सचिव गोकुळ लाड, उपाध्यक्ष मयूर साबळे, अच्युत मोरे, संस्थेचे पदाधिकारी राहुल शिंदे, दिनेश प्रधान, शिवाजी डाकूरकर, अजय नवगीरे, अजय शिंदे, गोपिनाथ ढोले, रंगनाथ खरात, अजिंक्य शिंदे, पवन पाचफुले, सुनिल चव्हाण, नशिर शेख, आशिष खरात, सुनील साळवे, अविनाश पाईकराव, शुभम आव्हाड आदींची उपस्थिती होती.
राज्यातील शहरीकरण वाढतंय, जंगल कमी होताहेत, त्यामुळे जंगली प्राणी घरात घुसू लागलेत. जंगली प्राण्यांबरोबर साप मोठ्या प्रमाणात घरा घरात निघत आहेत. आणि त्याच सापाचे रेस्क्यु सर्पमित्र हे जिव धोक्यात घालून करतात, एखाद्याच्या घरी साप निघाला तर वन विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी सापाचं रेस्क्यु करीत नाहीत. त्यांच्याकडे टेक्नीकल लोक आणि टेक्नीक वन विभागाकडे नाही. त्यामुळे त्यांना सर्पमित्रांची मदत घ्यावी लागते. अशा वेळी सर्पमित्र हा धोका पत्कारीत असतो. त्यामुळे त्यांना सुरक्षा देण्यासाठी शासनाने किमान 5 लाखाचा विमा काढावा आणि त्यांना ओळखपत्र देण्यात यावे अशी मागणी जालना विधानसभा मतदार संघाचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केलीय. त्या संदर्भातील सर्पमित्रांचा प्रश्न विधानसभेच्या सभागृहात मांडल्याने राज्यातील सर्पमित्रांच्या वतीने आमदार कैलास गोरंट्याल यांचे आभार मानलेत. काही दिवसापुर्वी जालना येथील निसर्गरक्षक प्राणीमित्र संघटनेच्या वतीने आमदार कैलास गोरंट्याल यांच्याकडे निवेदन देत सर्पमित्र आणि वन्यजिव रक्षकांच्या मागण्या मांडल्या होत्या. त्यावर आमदार कैलस गोरंट्याल यांनी विधानसभेत प्रश्न मांडतो असे आश्वासन दिलं होतं आणि त्यांनी ते पुर्ण करुन दाखविलंय. त्यामुळे राज्यभरात सर्पमित्र मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालंय.