देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. केरळमध्ये बुधवारी ३०० नवीन रुग्ण आढळले आहेत तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर देशात कोरोना रुग्णांची संख्या २६६९ वर पोहोचली आहे. आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. कोरोना कोणत्याही संसर्गजन्य रोगासारखा असून त्याचा पूर्णपणे नायनाट करता येणं शक्य नाही, असं मत केरळमधील एका आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केल्यामुळे चिंता वाढली आहे.
गेल्या २४ तासात भारतात कोरोनाच्या ३५८ नव्या रुग्णांची नोदं झाली असून त्यातील ३०० रुग्ण एकट्या केरळमधील आहेत. या कालावधीत देशभरात ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्या कर्नाटकमध्ये २, पंजाबमध्ये १ आणि केरमधील ३ रुग्णांचा समावेश आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या २६६९ वर पोहचली आहे.
24 तासात कोणत्या राज्यात किती रुग्ण
केरळ -३००
उत्तर प्रदेश -२
महाराष्ट्र -१०
कर्नाटक -१३
गुजरात – ११
सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या आणि महामारीशी लढण्याच्या तयारीत राहण्याच्या सूचना करण्यात केल्या आहेत. तसेच लस, औषधे, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलिंडरचा पुरेसासाठा सुनिश्चित करण्याचं आवाहन केलं आहे.
नव्या व्हेरिएंटने वाढवली चिंता
दरम्यान कोरोना व्हायरसच्या JN.1 या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली असून जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. भारतात देखील नव्या व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अमेरिकेतही नव्या व्हेरिएंटचा प्रसार वेगाने होत आहे.अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) ने या नव्या व्हायरसच्या प्रसाराचा वेग आणि त्याच्याशी संबंधित धोक्यांसंबंधी गंभीर इशाला दिला आहे. JN.1 कोरोना व्हायरसचा एक अत्यंत संसर्गजन्य प्रकार आहे. त्याचा वेगाने होणारा प्रसार यामुळे रुग्णालयात रुग्णांना मोठ्या संख्ये अॅडमिट करावं लागू शकते.