जालना – असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या घनसावंगी तालुक्यातील करडगाव येथील संगमेश्वर महादेव मंदिराकडे जाणारी वाट बिकट होती. पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय व्हायचा तेव्हा महिला भाविकांची ये-जा करताना गैरसोय व्हायची. भाविकांनी ही बाब भाजप नेते सतीश घाटगे यांना सांगितल्यानंतर अवघ्या चार महिन्यात रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. सतीश घाटगे यांच्या प्रयत्नामुळे हा रस्ता सिमेंट कॉंक्रीटने तयार झाला आहे.
२७ ऑगस्ट २०२३ रोजी सतीश घाटगे यांनी चिखलमय रस्त्याने प्रवास करून संगमेश्वराचे दर्शन घेतले होते. यावेळी सतीश घाटगे यांनी संगमेश्वर मार्ग सिमेंट कॉंक्रीटचा तयार करण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार या रस्त्यासाठी प्रामाणिक करदात्याच्या पैशातून आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यातून १५ लाखाचा निधी सतीश घाटगे यांनी मंजूर करून आणला. त्यातून अवघ्या ४ महिन्यात हा रस्ता पूर्ण केला. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर भाविकांसाठी स्वच्छतागृह, स्ट्रीट लाईट सह मंदिर परिसरात आवश्यक सोयी सुविधा निर्माण करून संगमेश्वर हे अध्यात्मिक केंद्र बनविण्याचा मानस असल्याचे सतीश घाटगे यांनी सांगितले.
या रस्त्यासाठी परमेश्वर महाराज इघारे, आत्माराम इघारे, सरपंच मच्छिंद्र घुले , सुदामराव असोले, श्रीमंत काका,जनार्धन जारे , बाबासाहेब जाधव, संभाजी महाराज, राम गायकवाड,दुष्यंत तिघारी, विक्रम इघारे, संदीप इघारे, संतोष इघारे, ग्रामपंचायत सदस्य गणेश घुले, विष्णू घुले, चेअरमन बाबासाहेब घुले, अभिषेक घुले, माजी सरपंच रामेश्वर पालवे यांच्यासह आदींनी प्रयत्न केले.