जालना – भारताचे माजी पंतप्रधान श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपा जालनाच्या वतीने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा कार्यालयात‘सुशासन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी जालना शहरातील जेष्ठ भाजपा कार्यकर्ते यांचा सत्कार करून ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी भाजपा पक्ष संघटन कार्यासाठी त्यांच्या अनमोल योगदानाबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करीत सन्मान केला.
आजचा दिवस हा पूर्णपणे स्व. अटलजींना समर्पित असतो. स्व. अटलजी एक प्रतिभासंपन्न असं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी भारताचं नाव अनेक क्षेत्रात मोठं केलं. स्व. अटलजींचे कार्य व विचार आपण सर्वांनी पुढे नेऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करणे, हीच त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन करीत ना. रावसाहेब पाटील दानवे यांनी स्व. अटलजींच्या व्यक्तित्व आणि कर्तृत्वाचा परिचय उपस्थितांना करुन दिला. भाजपाची स्थापनेपासून ते आजपर्यंतची वाटचालही अनेक प्रसंग व घटनाक्रमांतून दादांनी उपस्थितांना अवगत करून दिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, विधानसभा प्रमुख भास्कर (आबा) दानवे, प्रदेश निमंत्रित सदस्य राजेश राऊत, रामेश्वर भांदरगे, जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, अर्जुन गेही, अतिक खान, धनराज काबलिये, संध्याताई देठे, कैलास उबाळे, अनिल सरकटे, विजय कामड, सुनील खरे, रवी अग्रवाल, बद्री वाघ, तुलजेश चौधरी, विष्णू डोंगरे, सतीशचंद्र प्रभू, श्रीमंत मिसाळ, श्रीकांत शेलगावकर, प्रभुलाल गोमतीवाले, राजेंद्र भोसले, अरुण जाधव, उत्तमराव खरगे, संतोष खंडेलवाल, सोमेश काबलीये, कुंडलिक खरात, अमोल कारंजेकर, रोषण चौधरी, सुधाकर खरात, बबनराव सिरसाठ, बाबासाहेब कोलते, श्रीमती वंदना ढगे, मीना गायकवाड, वैशाली बनसोडे, संजय डोंगरे, अमोल धानुरे, काकासाहेब घुले, सुभाष सले, केशव सुपारकर, डोंगरसिंग साबळे, दत्ता जाधव, सतीश जाधव, मनोज इंगळे, अमन मित्तल, रोहित नलावडे, गोविंद ढेंबरे, नीलकंठ कुलकर्णी, माणिक फड, सय्यद इम्रान, नागेश अंभोरे, जुनेद मुर्झा, राहुल इंगोले, मनोज पाचफुले, सचिन मोहता, डोंगरसिंग साबळे, प्रशांत आढावे, विशाल उफाड, सतीश अकोलकर, सुदर्शन काळे आदींची उपस्थिती होती.