जालना शहरात दुचाकी चोरांनी आपले बस्तान कायम केलंय. पोलीसांनाही दुचाकी चोराचा शोध लागता लागेना झालाय. त्यामुळे नागरीकात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. आज अंबड चौफुली भागात गायत्री लॉन्स येथे लग्नासाठी आलेल्या एका वर्हाडी मंडळीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेलीय. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात या दुचाकीची चोरी झाल्याची नोंद करण्यात आलीय.
प्रभाकर बंडू भिंगारे यांची दुचाकी क्र. एम.एच.21 ए एम 9909 ही गाडी त्यांचा मुलगा प्रवीण भिंगारे हा लग्न सोहळ्या निमित्त अंबड चौफुली भागातील गायत्री लॉन्स येथे घेऊन आला होता. गाडी पार्क करुन तो लग्न सोहळ्यासाठी गेला. हीच संधी साधून चोरट्याने दुचाकी चोरुन नेली. लग्न सोहळा आटोपून प्रवीन भिंगारे हे गाडी लावलेल्या जागी आले असता त्यांना त्यांची दुचाकी दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी तालुका पोलीस ठाणे गाठून गाडी चोरीची नोंद केलीय. शहरातील गाडी चोराचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भिंगारे यांनी केलीय.