जालना – जिंगल बेल…जिंगल बेल..जिंगल ऑल द वे.. या गीतावर ठेका धरत जालना शहरातील ख्रिश्चन बांधवांनी ख्रिसमस उत्साहात साजरा केला. सर्वधर्मिय बांधवांनी ख्रिश्चन बांधवांना शुभेच्छा आणि भेटवस्तू देत हा पवित्र सण साजरा केलाय. शाळा, महाविद्यालयांबरोबरच खासगी संस्थांमध्येही ख्रिसमसचा उत्साह दिसून आला.
मुख्य आणि मोठं चर्च म्हणून ओळखलं जाणारं मिशन हॉस्पीटल येथील क्राइस्ट चर्च ऑफ कॅथ्रेडल आणि क्राईस्ट चर्च ऑफ सीएनआय येथे विविध कार्यक्रम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. सदरील चर्च हे 125 वर्ष जुनं असून या ठिकाणी मुख्य कार्यक्रमा साजरा केला जातो. नाताळ निमित्त तरुणांच्या कॅरल्स पार्टी रंगल्याच पहायला मिळालं. युवक व युवतींनी समुहाने आपल्या परिचितांकडे जाऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी येशू ख्रिस्ताची स्तुती गायली. शहरातील सर्वच चर्चमधील तरुणांनी कॅरल्समध्ये सहभाग घेतला. सकाळी साडेआठ वाजता सर्वच चर्चमध्ये भगवान येशू ख्रिस्त जन्माची भक्ती सुरू झाली. त्यानंतर दुपारी च्या सुमारास चर्चमध्ये सामुहिक प्रार्थना करण्यात आल्या. सकाळपासून ख्रिश्चन बांधव चर्चमध्ये येऊन कॅन्डल लावून प्रार्थना करीत होते. यावेळी लहान थोरासह अनेकांमध्ये उत्साहाचं वातावरण पहाला मिळालं.