जालना – शहरात सुरु असलेल्या अवैध धंद्या विरोधात जालना पोलीसांनी कारवाईचं हत्यार उपसल्याने अवैध धंद्यावाले भुमिगत झालेत. तरी देखील लपुन-छपुन ढवळेश्वर परिसरात सुरू असलेल्या कल्याण मटका नावाच्या जुगार अड्यावर डीवायएसपी सचिन सांगळे यांच्या पथकाने सायंकाळी छापा टाकुन दोन बुक्की सह दोघा एजंटाना ताब्यात घेतलं.
गजानन तौर यांच्या हत्येनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शहरासह जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यावर कारवाया करण्याचे निर्देश दिलेत. त्यानुसार सर्वञ छापेमारी सुरु असतांना अवैध धंदेवाले भुमिगत झालेत, माञ ढवळेश्वर येथे मोहन हॉटेलच्या पाठीमागे दोघा भावांना कल्याण मटका जूगार खेळतांना व खेळवितांना पकडण्यात आलंय. डिवायएसपी सचिन सांगळे यांच्या आदेशान्वये एपीआय ईंगेवाड, एएसआय खंडागळे, कैलास बहुरे आणि अशोक जाधव यांच्या पथकाने छापा मारुन रोख 12 हजार 205 रुपये व जुगाराचं साहीत्य जप्त केलंय. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात दत्ता सावंत, पांडुरंग सावंत यांचे बुक्की रोहीत तोडकर आणि कुणाल खाकीवाले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.