जालना – तालुक्यातील गोलापांगरी येथील ग्रामपंचायतीचा जुना कागदपत्राचा रेकॉर्ड अज्ञात व्यक्तीने फाडून फेकल्याची तर काही कागदपत्रे ही जाळून टाकल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आलीय. नेमका हा रेकॉर्ड कुणी आणि का फाडला असावा, रेकॉर्ड फाडून फेकण्यामागे आणि जाळून टाकण्यामागे काही भ्रष्ट्राचार दाबण्याचा प्रकार तर नाही ना अशी चर्चा गावात सुरु आहे.

दरम्यान ग्रामपंचायतीचा कागदपत्राचा जुना रेकॉर्ड फाडून फेकल्याची घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामविकास अधिकारी यांनी गावात धाव घेतली आहे. कागदपत्राची पाहणी केली. त्यावेळी त्यांना 1949 ते 1972 चा कागदपत्राचा रेकॉर्ड फाडून फेकल्याचा आणि काही रेकॉर्ड जाळून टाकल्याचे दिसून आले. त्यांनी या संदर्भात गावातील सरपंच आणि सदस्यांना बोलावून या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. हा रेकॉर्ड गायब करण्यामागे नमेका काय उद्देश होता?, एखाद्याने भ्रष्टाचार दाबण्यासाठी तर हा रेकॉर्ड जाळला नाही ना अशी चर्चा गावात सुरु आहे.




















