जालना – तालुक्यातील डोणगावात भाजप नेते तथा घनसावंगी विधानसभेचे निवडणूक प्रमुख सतीश घाटगे यांच्या यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शखासह विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा रविवारी मोठया उत्साहात पार पडला. डोणगावात ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह युवकांनी सतीश घाटगे यांचे जंगी स्वागत केले.
कोणत्याही संविधानीक पदावर नसताना केलेलल्या विकास कामांमुळे सतीश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली गावाचा विकास करण्यासाठी गावागावातील युवक व ज्येष्ठ नागरीक भाजपमध्ये दाखल होत आहे. रविवारी डोणगावात शाखा स्थापनेसह विकासकामांचा दिमाखदार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. भाजपचे शाखा अध्यक्ष बंडू खाडे, ज्येष्ठ कार्यकर्ते राम जायभाये, शाखा उपाध्यक्ष तोफिक पटेल, युवा शाखा अध्यक्ष सोमीनाथ जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील असंख्य शेतकरी व युवकांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. तत्पूर्वी सतीश घाटगे यांचे गावकऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतीषबाजी करुन जंगी स्वागत केले. तसेच गावातून मिरवणूक काढत मोठा जल्लोष केला. गावात दोन शाखांचे उद्घाटन, पाणंद रस्ता व बुद्ध विहाराच्या कामाचे सतीश घाटगे यांच्या हस्ते यावेळी उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती अवधूत खडके, उपसभापती अरुण घुगे, भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. रमेश तारगे, जिल्हा उपाध्यक्ष शीवाजीराव मोरे, जिल्हा सरचिटणीस रामेश्वर माने, तालुका उपाध्यक्ष भगवान बर्वे, प्रेमानंद उढाण, केदार राठी, कांताबापू म्हस्के आदी उपस्थित होते. यावेळी पंढरीनाथ खटके, बंडू खाडे, अरुण घुगे, अवधूत खडके यांनी घनसावंगी व अंबड तालुक्यातील जनतेवर झालेल्या अन्यायाची माहीती आपल्या भाषणातून दिली. या कार्यक्रमासाठी गणेश मुंढे, ज्ञानदेव विठ्ठलराव लोहार, राजेंद्र एकनाथ जायभाये, सावता उबाळे, अरुण खडेकर, सुंदर जायभाये, जगन जायभाये, सुरेश मुंडे, सोमनाथ जायभाये, सत्यम जायभाये ,रामेश्वर मुंडे, शुभम बडे, गौतम भालेराव, कैलास बबन, रंजीत साबळे, सुभाष हंगारगे, शहादेव मगरे, सुरजित गीतखणे, सुरेश मुंढे, शिवाजी जायभाये आदींनी परीश्रम घेतले.
घनसावंगी मतदारसंघातील जनतेस चाळीस वर्षे प्रस्थापित राजकारण्यांना खोटी आश्वासने देऊन फसवले. सुडाचे राजकारण करुन छळ, दडपशाही केली. या अन्यायाविरोधात जनतेच्या मनात आत उठाव करण्याची भूमीक तयार झाली असून, येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचा छळ करणाऱ्या प्रस्थापित राजकारण्यांना जनता उखडून फेकणार आहे. त्यामुळे विकासाचे व्हीजन असलेल्याए, तरुणांना दिशा देणाऱ्या लोकप्रनिधीच्या मागे उभे राहा, असे आवाहन यावेळी सतीश घाटगे यांनी गावकऱ्यांना केले.