जालना : तालुक्यातील रांजणी येथील जनार्दन स्वामी आश्रमातील मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामास रविवारी सुरुवात झाली. प्रामाणिक करदात्यांच्या पैशातून आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्यातून भाजप नेते तथा समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांच्या प्रयत्नातून या कामासाठी निधी प्राप्त झाला.
महामंडेश्वर (राष्ट्रीय महामंत्री जुना आखाडा)शिवगिरी महाराज, कैलास गिरी महाराज , सुनील गिरी महाराज, बालक गिरी महाराज व रामगिरी महाराज यांच्या शुभहस्ते या कामाचे रविवारी उद्घाटन झाले. रांजणीसह परिसरातील भाविकांचे जनार्दन स्वामी आश्रम हे श्रद्धास्थान आहे. या आश्रमातील मंदिर परिसराचे सुशोभीकरण व्हावे तसेच भाविकांसाठी सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी गौतम देशमुख, विजय वरखडे, विठ्ठल देशमुख आदींनी सतीश घाटगे यांच्याकडे पाठपुरावा केला. गावकऱ्यांच्या मागणीला प्रतीसाद देत सतीश घाटगे यांनी पेव्हर ब्लॉकच्या कामासाठी शासनाकडून निधी मंजुर करुन घेतला. त्यातून प्रत्यक्षात कामाला रविवारी सुरुवात झाली. याप्रसंगी पद्माकर महाराज बोंद्रे, मधुकर देशमुख, सचिन पाटोळे, प्रभाकर देशमुख, प्रीतम वरखडे, शामराव वरखडे, भगवान इंगळे, सतिष वरखडे, डॉ. दीपक जाधव, दत्ता वरखडे, परमेश्वर गारोळे, रमेश मोरे, महेश देशमुख, पवन हाडे, ज्ञानेश्वर देशमुख, आदिनाथ वरखडे, संजय हलगे, कुंडलिक सोलाट, अनिल वरखडे, अंबादास गाढे, रमेश देवकर, आनंद कुहिरे, रामा गारोळे, हनुमान सोलाट, दत्ता शीलवंत, प्रभाकर शिंदे, संभाजी गाढे, रामेश्वर इंगळे समस्त भक्ती मंडळ व गावकरी उपस्थित होते.