उरण तालुक्यातील कंठवली गावात आगीची भीषण घटना समोर आली आहे. कंठवली गावातील गव्हाण चिरनेर मार्गावर असणाऱ्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील लोकांना घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. आग किती मोठी आहे याचा अंदाज यावरुन लागता येईल की दूरवरुनही आग दिसून येत आहे. धुराचे लोट आकाशाला भिडले आहेत.

घटनेची माहिती मिळताच, ओएनजीसी, जेएनपीटी आणि उरण नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्नीशमन दलाच्या जवानांकडून सुरु आहेत.




















