जालना – शहरातील गांधी चमन येथे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडीचा वापर व्यवसायासाठी करणार्या दोन जनावर कदीम जालना पोलीसांनी कारवाई केलीय. ही कारवाई शुक्रवार दि. 26 जानेवारी 2024 रात्री 7 वाजता करण्यात आली असल्याची माहिती शनिवार दि. 27 जानेवारी 2024 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास देण्यात आली.
यावेळी सरकार पक्षातर्फे पोलीस उप निरीक्षक ज्ञानदेव आनंदा नागरे यांनी फिर्याद दिलीय. प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस निरीक्षक माने, पोलीस काँस्टेबल राऊत, गायकवाड हे पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गांधी चमन येथे खादयपदार्थ तयार करुन विक्री करण्यासाठी तसेच व्यवसायासाठी घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा वापरीत असल्याचे दिसून आले. यावेळी बळीराम रामभाऊ नागवे रा.माळीपुरा जुना जालना आणि नितीन नंदकीशोर घोडके रा. माळीपुरा जुना जालना यांच्या विरोधात अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.