जालना – शहरातील बुर्हाण नगर येथून 3 जनांणी हायवा चोरुन पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज शनिवार दि. 27 जानेवारी 2024 रोजी पहाटे 3.15 वाजेच्या सुमारास घडली. हायवा चोरणार्यामधील एकाला स्थानिक नागरीकांनी पकडून त्याला पोलीसांच्या स्वाधीन केलं असून दोन जनं मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरलेत.
या प्रकरणी शेख फारूख शेख सादिक यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, त्यांची हायवा क्र. चक 24 अइ 9988 ही गाडी त्यांच्या घराजवळ उभा असताना गाडीच्या रेसचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता गाडीत कुणीतरी असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांना वाटले त्यांचा ड्रायव्हर असेल त्यामुळे त्यांनी त्याला आवाज दिला. परंतु गाडी चालविणार्या व्यक्तीने आवाजाकडे दुर्लक्ष केलं. फिर्यादी आणि त्यांचा भाऊ जमील तुंडीवाले हे गाडीजवळ गेले असता गाडी चालविणार्याने त्यांना पाहुन खिडकीतून उडी मारुन पळ काढला. त्यामुळे गल्लीतील 20 ते 25 लोकांनी पळुन गेलेल्या इसमाचा शोध घेतला असता मार्कंडेय नगर येथील गल्ली मधुन तीन येतांना दिसले. त्यामुळे ते त्यांच्याकडे जात असतांना एक इसमाच्या हातात पिस्टल असल्या सारखी दिसली. त्यामुळे ते मागे झाले. परंतु, जमाव जास्त वाढल्याने 3 जनापैकी 2 जन पळून गेले तर एक जन हा एका पांढर्या रंगाच्या कार खाली लपलेला दिसला. त्यामुळे त्यांनी डायल 112 वर मदतीसाठी कॉल केला. काही वेळेतच घटनास्थळी पोलीस आले. तो पर्यंत जमावाने त्याला मारहाण केलेली होती. पोलीसांनी त्यास ताब्यात घेऊन विचारपुस केली असता सागर उर्फ पिराजी डिगांबर डुकरे रा. शनी मंदीर जुना जालना असं नाव सांगीतलं. पोलीसांनी त्यास पोलीस ठाण्यात नेलं. त्यानंतर फिर्यादीने हायवा जवळ जावून पाहिलं असता त्यांच्या क्रेटा कारला हायवा चोरण्याच्या प्रयत्नात धडक देवुन नुकसान केलं. त्यावेळी तीथे एक विना नंबरची स्कुटी , दोन अँड्रॉईड मोबाईल व एक साधा मोबाईल मिळुन आला. या प्रकरणी सदरबाजार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन सागर उर्फ पिराजी डिगांबर डुकरे आणि इतर दोन जनावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.