छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा येथून भाड्याने आणलेल्या रिक्षा चालकाला भाड्याचे पैसे देण्याच्या कारणावरुन दोन जनांनी मारहाण केल्याची घटना दि. 15 जानेवारी 2024 रोजी रात्री 8 वाजतेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी दि. 26 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संदर्भातील माहिती आज शनिवार दि. 27 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता पोलीस सुत्राकडून देण्यात आलीय.
या प्रकरणी सिध्दार्थ शेषराव बनकर रा. जय भवानीनगर, मुंकुदवाडी, छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की त्यांना चिकलठाणा येथून अशोक, समिर आणि ठाकूर नावाच्या इसमांनी सिंदखेडराजा येथे जाण्यासाठी रिक्षा भाड्याने घेतला होता. ते जालना येथून सिंदखेडराजाकडे जात असतांना जालना शहरातपासून पुढे थोड्या अंतरावर गेल्यानंतर भाड्याचे पैसे मागीतल्याने दोघांनी रिक्षा चालकाला मारहाण केली. त्यात समिरने त्याला सोडविले त्यामुळे रिक्षा चालक पुन्हा घरी निघून गेला. उपचार केल्यानंतर त्यांनी या प्रकरणी पोलीसात तक्रार दाखल केली असून या तक्रारीवरुन तालुका जालना पोलीस ठाण्यात दोन जनावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.