प्रामाणिक करदात्यांच्या पैशातून,महाराष्ट्र सरकारच्या सहकार्यातून सतीश घाटगे यांनी नालेवाडी गावाच्या विकासासाठी ५० लाखाचा निधी प्राप्त करून आणला.या निधीतून निम्मे कामे पूर्ण झाली.या कामांचे त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या कामांमध्ये मारुती मंदिर परिसरात स्वखर्चातून केलेले फरशी काम, पाणी पुरवठ्यासाठी नव्याने स्थापित रोहित्र, रोकडेश्वर मंदिर ते दिलीप बांगर यांच्या घरापर्यंतचा रस्ता, नालेवाडी – चुर्मापुरी रस्त्यावरील नदीवर पूल बांधकाम व गणपत नगर झोपडपट्टी अंतर्गत ४ सिमेंट रस्त्याच्या व नालेवाडी ते रामगव्हाण रस्ता दुरुस्ती कामाचा समावेश आहे. तर पंधराव्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या रोकडेश्वर संस्थान परिसरातील फेवर ब्लॉक काम व गावातील भूमिगत गटार नाली बांधकामाचे यावेळी भूमिपूजन सतीश घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास बाजार समितीचे उपसभापती अरुण घुगे, ओबीसी मोर्चाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बांगर, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष राहुल कणके,युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष विलास होंडे, बंडू मुंडे, रामकिसन जायभाये, सुरेश मुंढे, वसंतराव खोजे, गणेशराव खोजे, सरपंच पंढरीनाथ खटके, शेख सालरभाई, कांताराव उडदंगे, सरपंच रामेश्वर वैद्य, विजय खटके, मुसाभाई शेख, संदीप फटांगडे, नारायण कवडे, किशोर दखने, रतन गाडगे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.