दिल्लीमधून मनसुन्न करणारी घटना समोर आली आहे. पती सोबत असणाऱ्या वादातून जन्मदाता आईने आपल्याच दोन चिमुकल्यांना रस्त्यावर सोडून पसार झाली आहे.सध्या सोशल मीडियावर संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत असून या बाबतचा अधिकचा तपास पोलिसांकडून करण्यात येतोय. मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण घटना राजधानी दिल्लीतील जहांगीरपुरीमधील (ता.३१)बुधवार रात्रीची आहे. सालेब बेगम असे चिमुकल्यांच्या आईचे नाव आहे. बेगम या जोडप्याला एक ३वर्षीय मुलगी आणि साधारण एक वर्षाच्या मुलगा आहे.
सालेम आणि तिच्या पतीमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाल्यानंतर महिलेचा पती आसामधील त्याच्या गावी गेला मात्र पतीसोबत झालेल्या वादाचा राग सालेमच्या मनात होता. याच रागातून सालेमने आपल्या मुलीला आणि साधारण एक वर्षाच्या मुलाला मध्यरात्री जहांगीरपुरी बी ब्लॉकमध्ये राहणाऱ्या चुलत बहिणीच्या घराबाहेर ठेवून आसामला निघून गेली.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, सालेब ही तिच्या दोन चिमुकल्यांसह दिसते. बराच वेळ एका ठिकाणी उभी राहिल्यानंतर ती आसपास कोणी तिला बघत आहे का हे पाहते. त्यानंतर ती चिमुकल्यांना जमिनीवर सोडून पळताना दिसते. यानंतर दोन्ही मुले रडत असून आईच्या मागे जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,या दोन चिमुकल्यांना पोलिसांनी आसाममध्ये असलेल्या पालकांच्या परत करण्यात आले आहे. मात्र याबाबत कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.