जालना जिल्ह्याची जबाबदारी मिळाली तेंव्हा मोठ्या प्रमाणात मनभेद होते, पोलीसावर समाजाचा रोष होता, तर पोलीस फोर्सचे देखील मनोबल खचले होते. शिवाय मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु होते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे हिंसक वळण लागू नये यासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम केलं. आणि आंदोलक, शासन यांचा दुवा म्हणून काम करण्याची तसेच एकाच वेळी वेगवेगळे रोलमध्ये काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल आभार मसनतो असे पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी म्हटलंय. त्यांना आज रविवार दि. 4 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता पोलीस अधिक्षक कार्यालयात निरोप देण्यात आला. यावेळी ते पत्रकारांसोबत बोलत होते.
यावेळी बोलतांना त्यानी जालनेकरांचे आभार मानलेत. त्यांनी दिलेलं प्रेम मी सोबत घेऊन जात आहे. त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला, मन भेद दुर करुन सर्व एकत्र झाले. सर्वांसोबत चांगला संवाद साधता आला. हे फक्त त्यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासामुळेच शक्य झालं, त्यामुळे पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी आंदोलक आणि शासनाचं आभार व्यक्त केलंय.