- जालना जिल्ह्याचे नवीन पोलीस अधिक्षक अजय कुमार बंन्सल यांनी आज रविवार दि. 4 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता पदभार घेतलाय. यावेळी त्यांचे पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले असून त्यांनी पत्रकारांसाबत देखील चर्चा केली.
जालना जिल्हा हा अत्यंत शांत आणि शिस्त प्रिय जिल्हा आहे. एक प्रोग्रेसिव्ह आणि इंडस्ट्रीयल जिल्हा म्हणून जालन्याची ओळख आहे. आणि ती ओळख कशी कायम ठेवता येईल ही प्रशासन, पोलीस आणि नागरीकांची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन सामान्य नागरीकांच्या प्रश्नांची सुटका कशी करता येईल हा माझा प्रयत्न असेल असे नव्याने रुजु झालेले पोलीस अधिक्षक अजय कुमार बंन्सल यांनी म्हटलंय. शिवाय जालना जिल्ह्यात जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था राखून पोलीसांचे मनोबल वाढविणे आणि गुन्हेगारावर कंट्रोल ठेवण्याचे काम अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने केलं जाईल असा विश्वास देखील पोलीस अधिक्षक अजय कुमार बंन्सल यांनी व्यक्त केलाय. जालना जिल्ह्याची पोलीस अधिक्षक म्हणून दिलेली जबाबदारी पुर्ण प्रयत्नाने पार पाडणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय.