जालना – शहरातील मंठा रोडवर असलेल्या डि मार्ट मध्ये जर तुम्ही खरेदी करण्यासाठी जात असला तर वेळीच सावध व्हा. याच डि मार्ट मध्ये खरेदी करणे एका ग्राहकाला चांगलंच महागात पडलंय. डि मार्ट मध्ये खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका ग्राहकाचा मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने चोरुन घेतल्याची घटना दि. 4 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडलीय. या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संदर्भातील माहिती आज सोमवार दि. 5 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारा पोलीस सुत्रांनी दिलीय.
या प्रकरणी भुषण राजेंद्र कडु यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की, ते दि. 04 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास डि मार्ट मध्ये खरेदीसाठी गेले होते. तीथे ते कॅप घेण्याच्या टॉल जवळ गेले असता त्यांचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरुन नेला. त्यांना बील देण्याच्या वेळी मोबाईल नसल्याचे लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी तालुका जालना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.