उरण (तृप्ती भोईर) – उरण तालुक्यात समाजहित, सामाजिक बांधिलकी जाणाऱ्या अनेक महिला संस्था कार्यरत आहेत, त्यातीलच एक कुटुंबिनी महिला संघ, महिलांसाठी नेहमीच झटणारी, महिलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देणारी, ज्या संस्थेचे ब्रीदवाक्यच आहे, “बंधन मायेचे ,आपुलकेचे,” “तुच तुझ्या साठी आहेस खास” या दोन वाक्यातच ‘सार’लपले आहे या संस्थेच्या कार्यप्रणाली चे वर्षातून दोन वेळा म्हणजे महिलांसाठी मंगळागौर व हळदीकुंकू हे दोन भव्यदिव्य असे कार्यक्रम होत असतात या कार्यक्रमात फक्त उरण मधील नाही तर आजुबाजूच्या गावांतील महिला देखील या कार्यक्रमात सहभागी होत असतात. हे दोन कार्यक्रम म्हणजे महिलांसाठी पर्वणीच असते. त्यातीलच महिलांसाठी हळदीकुंकू व सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक ४ फेब्रुवारी रोजी नानासाहेब धर्माधिकारी उरण नगरपालिका शाळेच्या भव्य पटांगणात पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून जेष्ठ मराठी अभिनेत्री सविता ताई मालपेकर, निता ताई बालदी, राष्ट्रवादी च्या नेत्या भावना ताई घाणेकर, माजी नगराध्यक्षा सायली ताई घरत हेमांगी पाटील राष्ट्रवादी उरण तालुका अध्यक्षया होत्या.
ढोल ताशे, लेझीम च्या गजरात मान्यवरांचे स्वागत झाले. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची मधुर सुरूवात दर्शना माळी हिच्या गोड वाणी असली तरीही पहाडी आणि दमदार आवाजात निवेदनास सुरूवात झाली.तीच्या लाघवी शब्दांत तीने कार्यक्रमात रंगत आणली. तदनंतर आलेल्या पाहुण्यांचे कुटुंबिनी च्या कार्यकारिणी मंडळाने सुंदर स्वागत केले. त्यानंतर कुटुंबिनी च्या अध्यक्षा श्लोक पाटील यांनी संस्थेचा अहवाल सादर केला. त्यानंतर संस्थेच्या संस्थापिका आरती ढोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले, आलेल्या मान्यवरांमध्ये भावना ताई घाणेकर, सायली ताई म्हात्रे, व प्रमुख पाहुण्या सविता ताई मालपेकर यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे नियोजन फार सुंदररीत्या केले होते महिलांसाठी असलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या’ नारी शक्तीचा’ ही इथे सन्मान करण्यात आला. यामध्ये सहा महिलांना गौरवण्यात आले, भाग्यश्री साठे मॅडम शैक्षणिक, सरवीन भायजी व्यावसायिका, सिमा घरत सामाजिक कार्य, सारिका पाटील रिक्षा चालिका, तृप्ती भोईर पत्रकार, स्वरांगी जाधव मिस टिन नवी मुंबई २०२४ गॉडेस ऑफ एलिगन्स त्याचबरोबर महिलांसाठी हळदीकुंकू व त्यामध्ये एक गिफ्ट ,विविध वस्तूंचे स्टॉल मांडण्यात आले होते यामध्ये हेल्थ चेकअप साठीही एक स्टॉल मांडण्यात आला होता. चटपटीत खाणे, ज्वेलरी इत्यादी स्टॉल मांडण्यात आले होते.
मान्यवरांचे व्यासपीठावरील स्वागत व मनोगतानंतर सांस्कृतिक कार्यक्रमातही विविधता दर्शविणारे नृत्य, गायन एवढेच काय तर आरोग्य विषयावरील म्हणजे स्टेजवर योगा सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविणारे सादरीकरण करण्यात आले. याहीपेक्षा जेष्ठ अभिनेत्री सविता ताई मालपेकर यांना कार्यक्रम पहाण्यासाठी एवढा उत्साह आला होता की, स्टेज वरील एक एक परफॉर्मन्स पाहून न राहवून त्यांनी ही स्टेजवर नृत्य करण्याची आपली इच्छा पूर्ण केली.
या बहारदार कार्यक्रमासाठी कुटुंबिनी महिला संघाच्या अध्यक्षा श्लोक पाटील, संस्थापिका आरती ढोले, कार्याध्यक्षा दर्शना गावंड, उपाध्यक्षा दिपीका माळी, सचिव नयना धोत्रे, सहसचिव प्रियांका घरत आणि प्रियांका मयेकर, खजिनदार वृषाली पवार, सह खजिनदार निशा म्हात्रे आणि शुभांगी शिंदे, जनसंपर्क अधिकारी प्रिया मयेकर, सल्लागार गायत्री माळी, अवंती साळवी, सदस्या पुर्वी खोशे, कल्पना सुर्वे, प्रिती पाटील, सविता डेरे, संगिता साळुंखे आदींनी विशेष मेहनत घेतली.