जालना तालुक्यातील पारेगाव येथे आज गुरुवार दि. 8 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 6 ते 6.30 वाजेच्या सुमारास गावातील 10 ते 12 जनाच्या टोळक्याने बौध्द समाजातील कुटुंबीयावर जिवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. बुध्द विहाराला लावलेल्या कंपाऊड जाळीच्या कारणावरुन ही घटना घडल्याचं सांण्यात आलंय. या घटनेत सुमार 10 जणं जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान् य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात रात्री 11 ते 12 च्या दरम्यान गुन्हा नोंदविण्याची प्रक्रीया सुरु आहे.
घटना घडल्याची माहिती मौजपुरी पोलीसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांनी पोलीसांच्या फौजफाट्यासह घटनास्थळी भेट दिली. या मारहाणीत जखमी लोकांना पोलीसांनी त्यांच्या वाहनातून मौजपूरी पोलीस ठाणे येथे आणून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत यांनी देखील भेट दिली असून गावात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय. परिस्थीतीवर पोलीस लक्ष ठेवून असून सध्या वातावरण शांत आहे. या मारहाणीची माहिती मिळताच बौध्द समाजातील तरुणांनी मौजपुरी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.