जालना शहरात गेल्या अनेक दिवसापासून बेकायदेशीर आणि अवैधरित्या वाळुची वाहतुक व विक्री सुरु आहे. त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने त्यांनी दिवसा ढवळ्या शहरात वाळुची वाहने फिरवायला सुरुवात केली. त्यामुळे रोहनवाडी रोडवरील गुरुकुल शाळेजवळ वाळुच्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आज शनिवार दि. 10 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास देण्यात आली. या प्रकरणी कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
जालना तालुक्यातील रोहनवाडी रोडवर गुरुकुल शाळेजवळ विना रॉयल्टी वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडुन तो जप्त करण्यात आलाय. यावेळी ट्रॅक्टर चालक लखन सुभाष कमाने याच्याकडे पथकाने रॉयल्टीच्या पावतीची विचारणा केली असता त्याच्याकडे रॉयल्टी दिसून आली नाही. त्यामुळे पोलीसांनी गुन्हा नोंद केलाय. तर अंबड चौफुली येथे देखील वाळुची अवैध वाहतूक करणारा हायवा पकडला असून त्याच्यावर तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.