कुंभारी :- ‘सबका साथ, सबका विकास’ या मूलमंत्रावर चालणारी पार्टी म्हणजे भाजपा पक्ष आहे. भाजपाच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि विकास कामांवर विश्वास ठेवून अनेक लोक इतर पक्षातून भाजपात पक्षप्रवेश करत आहेत. सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा पक्ष असल्याची ग्वाही भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी येथील पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी दोडडीचे उपसरपंच विशाल राठोड यांच्यासह असंख्य तरुण सहकारी कार्यकर्त्यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी अक्कलकोटचे भाजप तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, दक्षिणचे तालुका अध्यक्ष संगप्पा केरके, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अण्णाराव बाराचारे,सरपंच महेश पाटील, श्रुती निकंबे, सिद्धाराम हेले , संदीप राठोड, केदार विभुते, बाबू राठोड, अनिल राठोड, सुनील कळके, वैभव हलसंगे, प्रवीण चौगुले, उपस्थित होते.
कल्याणशेट्टी म्हणाले की, आज देशात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. सरकारसोबत गावाने राहिल्यास विकास कामांना खीळ न बसता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असतो. आमदार या नात्याने या भागातील रस्त्यांचे काम पूर्ण केलेले आहे. दोड्डीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार आहे . उपसरपंच राठोड यांनी दोड्डी गाव हे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता आता दोड्डी गाव हे भाजपमय करणार असल्याचे सांगितले तसेच संजयगांधी निराधार योजनेच्या माध्यमातून गरजूंना मोठ्या प्रमाणात मदत सुरू आहे. कल्याणशेट्टी यांच्यावर विश्वास ठेवून अनेकजण पक्षप्रवेश करीत असल्याचे उपसरपंच विशाल राठोड यांनी सांगितले. आहेत.दोडडीचे ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.