जालना – रोटरी परीवार जालना व रत्ननिधी फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी आज शुक्रवार दि. 23 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात कृत्रीम अवयव मोजमाप शिबर घेण्यात आलं. यावेळी 227 दिव्यांगानी सहभाग नोंदविला होता. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शिबीराचे उद्घाटन एका दिव्यांग महिलेच्या हाताने करण्यात आले.
या शिबीरातील दिव्यांगांना जयपुर फुट, कृत्रिम हात तसेच कुबड्या मोफत देण्यात येतणार आहे. त्यासाठी आजपासून दोन दिवशीय मोजमाप शिबिराचा शुभारंभ झाला.
याप्रसंगी रोटरीच्या सहप्रांतपाल स्मिता भक्कड, रोटरी परिवारातील सचिन लोहिया, सागर दक्षिणी, डॉ. सुजाता नानावटी, अनया अग्रवाल, ऍड. महेश धन्नावत, सुमित बुढाणी, प्रकल्प प्रमुख डॉ. कैलास दरगड, डॉ. अतुल जिन्तूरकर, डॉ. अनिकेत करवा, डॉ. श्रेयांश गादीया, डॉ. राजन उढ़ाण, रत्ननिधी फाउंडेशनच्या तंत्रज्ञांची टीम, रोटरी पदाधिकारी आणि सदस्यांची उपस्थिती होती.