एक मोठी बातमी समोर येत आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय महाराज बारस्करांवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची बातमी समोर येत आहे. जरांगे यांच्याविरोधात बारसकर यांनी आपली भूमिका मांडली होती. त्यांनी जरांगे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. यातच आज त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज चर्चगेट परिसरामध्ये बरासकर हे प्रवास करत असताना काही लोकांनी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला, अशी माहिती त्यांनी स्वतः दिली. यातच जवळच असलेल्या मरीन ड्राईव्ह पोलिसांनी हल्लेखोरांना अडवलं आणि ताब्यात घेतलं. पोलिसांनी बरासकर यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय महाराज बारस्करांवर पाच ते सहा लोकांनी हल्ला केला होता. त्यांची पत्रकार परिषद होणार होती, मात्र हल्ला होणार असल्याची माहिती आधीच मिळाल्याने ती रद्द करण्यात आली आहे. मात्र त्यांच्यावर अद्याप कुठलाही गुन्हा दाखल केला नाही. याप्रकरणी तक्रार आल्यास गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.