कुंभारी :- दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील ऐतिहासिक विहिरीचे भूमिपूजन आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे, जिल्हा परिषद सदस्य अँड संजय गायकवाड, राष्ट्रवादीचे संतोष पवार, जुबेर बागवान, जी.एम.ग्रुपचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या उपस्थित करण्यात आले.
24 एप्रिल 1937 आली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उद्घाटन केलेल्या विहिरीचे जतन व सुशोभीकरण करण्याची मागणी बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित होती. जिल्हा नियोजन समिती सदस्य आनंद चंदनशिवे यांच्या प्रयत्नातून या परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी व विहिरीवर स्तूप बांधण्यासाठी 72 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता त्या कामाचा शुभारंभ आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वळसंगचे सरपंच जगदीश अंटद, जिल्हा परिषद अँड संजय गायकवाड, उपसरपंच आरिफ कुरेशी यांच्यासह गावातील सर्व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक व परिसराच्या गावातील भीमसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
शाखा अभियंता राजेश जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून या ठिकाणी विहिरीवर स्तूप व आजूबाजूच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यांच्या या विशेष प्रयत्नाचा गौरव व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
गणेश पुजारी, आकाश गायकवाड, दीपक गायकवाड, रवी गायकवाड, सिद्धराम वाघमारे, शांतकुमार गायकवाड त्यांच्यासह भीमसैनिकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.