जालना शहरातील बस स्थानक परिसरात नशेचं इंजेक्शन देऊन लुटणार्या टोळीतील एका लेडी डॉनला पोलीसांनी ताब्यात घेतलं असून तीची चौकशी सुरु आहे. ही कारवाई आज शुक्रवार दि. 1 मार्च 2024 रोजी केली असल्याची माहिती रात्री 9 वाजता पोलीस सुत्रांनी दिलीय.
जालना शहर हे बीहारच्याही पुढे कधीच निघून गेलंय. रोजच होणार्या चोर्या, मारामार्या आणि पडणारे दरोडे पाहुन जालना जिल्ह्यातील जनता भयभीत झालीय. मारहाण करुन लुटणार्या बरोबर आता रात्रीच्या वेळी एकटं गाठून नशेचे इंजेक्शन टोचून लुटणारी टोळी जालना शहरात सक्रीय झाल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी सदरबाजार पोलीस ठाण्यात दि. 28 फेब्रुवारी 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या टोळीतील एकाला पोलीसांनी कालच अटक केली होती. आज पुन्हा याच टोळीतील एका लेडी डॉनला पोलीसांनी ताब्यात घेलंय.
इंजेक्शन द्वारे नशेचे द्रव्य अनेक तरुणांच्या शरीरात पसरवून तरुणांच्या जिधाला धोका निर्माण करणार्या टोळक्याने जालना शहरातील बस स्थानक परिसरात दहशत माजवली होती. हे टोळके रोजच या परिसरात येऊन सावज शोधून त्यांना निर्जनस्थळी नेत होते. आणि तिथे त्याला नशेचे इंजेक्शन टोचून आपले इप्सीत साध्य करत होते. असे अनेक प्रकार या भागात झाले, परंतु, भितीपोटी तरुणांनी त्यांच्या विरोधात आवाज उठविला नाही. पंरतु आता पोलीसांनी त्यांचा हिशोब करायला सुरुवात केलीय.
गेल्या काही दिवसापुर्वी पोलीसांनी वगेवेगळ्या नशेच्या गोळ्यावर आणि औषधावर कारवाई केली होती. ड्रग्सच्या आहारी गेलेल्या आणि याच टोळक्याचा शिकार झालेल्या तरुणाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालाय. त्यामुळे या घटनेचे बींग फुटले असून या पुर्वी अशा कीती तरुणांना लुटलंय याचा पोलीसांनी तपास करणे गरजेचे आहे. या प्रकरणी मोहसिन उर्फ भाई खान रा. छत्रपती संभाजीनगर चौफुली, जालना, मुकरम लाला रा. दुखी नगर, जालना, शोएब काजी रा. कसबा, विठ्ठल मंदीर, जालना, सोहेल उर्फ झमेला आणि एका महिलेने हा प्रकार सुरु केलाय. दि. 21 फेब्रुवारी 2024 रेाजी रविराज हॉटेल परिसरात निर्जन स्थळीनेत एका तरुणाला बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर महिलेने तिच्याजवळ असलेल्या नशेच्या द्रव्याचे इंजेक्शन या तरुणाच्या पाठीत जबरदस्ती टोचलं. तरुणाचा मोबाईल घेत त्याला बेदम मारहाण करण्यात आली. अखेर या प्रकरणात सदर बाजार पोलीस ठाण्यात सर्व आरोपी विरोधात भादंवी कलम 395, 397, 328 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.