सोलापूर जिल्ह्यात दोन – तीन वर्षात दक्षिण सोलापूर येथे हरभरा पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या अनुषगाने हरभरा पीक पाहणी कीड व रोग व्यवसथापनाबाबत रिलायन्स फाऊंडेशन व दक्षिण कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी गावात हरभरा घेणाऱ्या शेतकरयांना साठी 27/02/24 रोजी प्रत्यक्ष हरभरा प्लॉट वर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंडल कृषी अधिकारी येमुल सर, कृषि पर्यवेक्षक बनसोडे सर तसेच कृषी सहाय्यक सोनाली नाईकनवरे मॅडम यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात गावातील हरभर लागवड केलेले शेतकरी सामील झाले होते. या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी घाटे पोखरणारी आळी ,लष्करी आळी , फुलगळ नियंत्रणासाठी कोणते उपाय करावे, कोणत्या आणि कशा प्रकारे फवारण्या घ्याव्या तसेच शेती विषयक योजना, गट शेती याचे मार्गदर्शन तज्ञांनी केले व त्याच्या आडचणी सोडवल्या. आणि या सर्व कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फौंडेशनचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक आकाश जेऊरगी यांनी केले होते. तर या कार्यक्रमाला निर्मला जवळे, तनुजा जवळे, यांच्यासह अनेक शेतकरी महिला उपस्थित होत्या.हरभरा पिकासाठी कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकरी महिलांना मार्गदर्शन.