जालना तालुक्यातील वंजार उम्रद भातखेडा येथील एका पुरुषासह 2 महिलांना बेदम मारहाण केल्याची घटना दि. 6 मार्च 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारस घडली. या मारहाणीत जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी चंदनझीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी पोलीसांनी केलेल्या कारवाईवर समाधानी नसल्याची माहिती फिर्यादी संतोष शिंदे यांनी आज रविवार दि. 10 मार्च 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता दिलीय.
वंजार उम्रद भातखेडा येथील संतोष शिंदे यांना आणि इतर 2 महिलांना 5 महिला आणि 5 पुरुष यांनी मिळून बेदम मारहाण केली होती. त्यात 3 जन जखमी झाले असून 6 मार्च 2024 पासून आजपर्यंत त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असला तरी फिर्यादींनी पोलीसांच्या कारवाईवर समाधानी नसल्याचे म्हटलंय. ही मारहाण घरात घुसुन झालेली असतांनाही पोलीसांनी तसा उल्लेख केला नसल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.