जालना शहरातील मंठा बायपास रोडवर रोहनवाडी पुलाजवळ आज रविवार दि. 10 मार्च 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास एक थरकाप उडविणारी घटना घडलीय. जालना बायपास रोडवरुन भरधाव वेगात धावणार्या इर्टीका कार क्र. एम.एच. 38 व्ही 6120 या गाडीने एका दुचाकीला जोराची धडक दिली. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहन कुंडलीका नदीपात्रात पुलावरुन कासेळले.
मंठा बायपास रोडवरील रोहनवाडी पुलाजवळ दुचाकी क्र. एम.एच. 21 बीएम 9092 या दुचाकीला इर्टीका कार क्र. एम.एच. 38 व्ही 6120 ने धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील एक पुरु आणि एक महिला जखमी झाले असून त्यांना उपचारकामी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आलंय. तर इर्टीकामधील जखमींना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती उपस्थितांनी दिली. सदरील वाहन पुलाखाली कोसळताच मोठा आवाज झाला. त्यामुळे लोकांनी पुलाकडे धाव घेतली. सदरील वाहनाला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याने काही काळ वाहतुक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील कार्यवाही पोलीस करीत आहेत.