लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था शाखा कुंभारी यांच्यातर्फे आयोजित महिला दिन कार्यक्रम संपन्न 9 मार्च रोजी लोक मंगल पतसंस्था कुंभारी आयोजित महिला दिन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हिरकणी जिल्हा प्रतिनिधी निर्मला जवळे कुंभारी (तलाठी) कोतवाल गुरुदेवी जवळे अंगणवाडी सेविका भाग्यश्री जवळे व ग्रामपंचायत ऑपरेटर शर्मिला जवळे कमलाबाई बाराचारे यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकमंगल पतसंस्थेच्या वतीने आपल्या प्रमुख पाहुण्यांचे सत्कार समारंभ करण्यात आले.तसेच लिंबिचिंचोली येथील आशाताईंचा सत्कारही करण्यात आला.व त्यांचे मनोगत व्यक्त करण्यात आले भाग्यश्री जवळ यांनी बोलताना महिलांनी घरात बसू नये, सर्व महिलांना वेगवेगळे कलागुण असतात, त्या दिवसभर घरातील कामे त्तर करतातच पण त्याचबरोबर बाहेरही पडावे, असे सांगितले, निर्मला जवळे म्हणाल्या की महिलांनी सर्व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, योजनांमध्ये सरकारी फी कमी असते व दलालमार्फत महिलांकडून जास्त रक्कम घेतली जाते.न शिकलेल्या महिलाही सर्व योजना मिळवू शकतात, बाहेर पडतात तर शिकलेल्यांनी का घरात बसावे, त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा फायदा करून घ्यावा, व स्वतः सक्षम बनावे, सावित्रीबाईंनी अनेक कष्ट सोसले म्हणून आज आपण बाहेर पडत आहोत, असे सांगितले.
गुरुदेवी म्हणाल्या महिला या सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत कोणते क्षेत्र असे नाही की महिला मागे आहेत, अंतराळा पासून ते नेव्ही या सर्वच क्षेत्रातमहिला काम करतात महिलांना महिला दिनानिमित्ताने मान सन्मान करू नये तर प्रत्येक दिवशीच मान द्यायला हवा, प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना महिलांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक अधिकारी निकम मॅडम यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम प्रज्ञा मनुरे यांनी घेतले, बँकेत आरडी, एफडी करावे, त्यामध्ये पहिला हप्ता पतसंस्था भरते, व 23 महिन्यांनी दहा टक्के व्याजदर नी परत करते, असे निकम मॅडम यांनी सांगितले, गावातील बरेच महिला उपस्थित होत्या, त्यांना स्नॅक्स चहा व गुलाबाचे फुल देऊन सत्कार करण्यात आले.