जालना तालुक्यातील रामनगर साखर कारखाना येथे दि. 16 मार्च 2024 रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास कारखाण्यातील लोखंडी साहित्य चोरुण नेण्याचा प्रयत्न करणार्या 10 महिलांना रंगेहात पकडले असून त्यांच्यावर मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती काल दि. 17 मार्च 2024 रोजी रात्री 9 वाजता पोलीस सुत्रांनी दिलीय.
या प्रकरणी कारखाण्याचे वॉचमन परमेश्वर किसनराव यादव रा. रामनगर ता. जि. जालना यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, रामनगर साखर कारखाणा येथे ते वॉचमन म्हणुन मागील दोन वर्षापासुन काम करतात. ते आणि त्यांचे सहकारी बबन घाटे, लहु पवार, भारत नागवे हे रात्री 12 ते सकाळी 08 वाजेपर्यंत ड्युटीवर असतांना दि. 16 मार्च 2024 रोजी सकाळी 6 वा. सुमारास त्यांना कारखाण्याच्या पाठीमागे बटरी चमकतांना दिसल्या, त्यामुळे त्यांनी तिथे जाऊन पाहित्रे असता अज्ञात महीला दिसून आल्या. त्यांनी कारखाण्याच्या बॉयलर विभागातील मुख्य कारखाण्याच्या आरबीसी चे शेटर उचकटुन त्यातील लोखंडी पाईप, अँगल, लोखंडी वॉल, ईलेक्ट्रीक मोटारीचे सामान व ईतर लोखंडी सामान गोण्यात भरताना दिसून आल्या. यावेळी माया शिवाजी साळवे, संगीता रतन खंदारे, मनिषा रामु आठवले, आशा आंशुराम डोले, उषा बंडु ढोले, वंदना राजु खंडागळे, आशा संजय वाहुळ, उषा रमेश खरात, मंगल जॉन्सन कारके, वंदना रमेश म्हस्के सर्व रा मोरांडी मोहल्ला ता जि जालना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.