जालना : देशभरात घोषीत करण्यात आलेल्या लोकसभाग निवडणूकीत जालना लोकसभा मतदार संघातील 2 हजार 61 मतदान केंद्रावर तब्बल 19 लाख 34 हजार 621 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. तर 2 हजार 369 सेना दलातील मतदार देखील मतदानाचा हक्क बजाणार आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या सुचनेप्रमाणे पुर्ण तयारी झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जालना लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज रविवार दि. 17 मार्च 2024 रोजी दुपारी 2 वाजता पत्रकार परिषदेत दिलीय.
यावेळी बोलतांना त्यांनी सांगीतले की, दि. 18 एप्रिल रोजी अधिसुचना जारी करण्यात येणार असून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक हा 25 एप्रिल राहणार आहे. नामनिर्देशनपत्राची छाननी दि. 26 एप्रिल रोजी तर 29 एप्रिल पर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. जालना लोकसभेसाठी दि. 13 मे 2024 रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून दि. 4 जुन 2024 रोजी निकाल घोषीत होणार आहे. जालना लोकसभेत एकून 6 विधानसभा मतदार संघ समाविष्ट आहेत. जालना लोकसभेसाठी 10 लाख 18 हजार 251 पुरुष मतदार, 9 लाख 16 हजार 319 महिला मतदार तर 51 तृतीयनपंथी मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
जालना लोकसभा मतदार संघात 13 संवेदनशील आणि अति संवेदनशी मतदान केंद्र असून त्यावर पुर्णवळे ऑनलाईन कॅमेर्याची नजर राहणार आहे. 85 वर्ष वयापेक्षा जास्त मतदार आणि दिव्यांगाना मतदार करण्यासाठी केंद्रावर येता येत नसेल अशा मतदारांना घरीच राहुन मतदान करता येणार आहे. त्यासाठी एक बॅलेट घरी जावून मतदान नोंदविणार आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पुर्ण नियोजन करण्यात आलं असून प्रत्येक मतदाराला त्याचा हक्क बजावता येणार आहे. जालना लोकसभेत एकूण 16 हजार 408 दिव्यांग मतदार असून 33 हजार 238 मतदार हे 85 वर्ष वयापेक्षा जास्त वयाचे आहेत. मतदान केंद्रावर मुलभुत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असून पिण्याचे पाणी, शौचालय, वाहनतळ आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जालना लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगीतलं. यावेळी उप जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री हदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना यांची उपस्थिती होती.