जालना जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व पक्षिय जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सचिन कांबळे यांची तर सचिव पदी अॅड. सिध्दार्थ चव्हाण, कार्याध्यक्षपदी कपिल खरात, कोष्याध्यक्षपदी प्रविण रत्नपारखे यांची सर्वानुमते निवड करण्यात आलीय. आज रविवार दि. 17 मार्च 2024 रोजी दुपारी 12 वाजता आनंद नगर येथील नागसेन सभागृहात झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आलीय.
यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. बी. एम. साळवे यांची तर सदस्य अॅड. ब्रम्हाणंद चव्हाण, सुधाकरशेठ रत्नपारखे, गणेश रत्नपारखे, सुभाष गाडगे, अरुण मगरे, सुनिल साळवे, सुधाकरभाई रत्नपारखे, अशोक साबळे, सुनिल रत्नपारखे, महेश निकम, महेंद्र रत्नपारखे, अनिल रत्नपारखे, सिध्दार्थ हिवाळे, अमित साळवे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून त्यासाठीची उर्वरीत कार्यकारीणी लवकरच जाहिर करणार असल्याची माहिती सचिव अॅड. सिध्दर्थ चव्हाण यांनी दिलीय.